HW News Marathi
देश / विदेश

अमित शाह, शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार!

गुजरात। गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागली आहे. आज दुपारी 2.20 मिनिटांनी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. गृहमंत्री अमित शाह या शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. ते आज दुपारी 12.30 मिनिटांनी अहमदाबादमध्ये पोहोचणार आहेत. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. मात्र नेहमीप्रमाणे भाजपने पुन्हा आश्चर्यचा धक्का देत मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान दिली.

पण भाजपनं एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय

रविवारी भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली. याच बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर मोहोर लावण्यात आली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावं चर्चेत होती. पण भाजपनं एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि पाटीदार समाजातून येणाऱ्या भूपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपावली. अशातच आज म्हणजेच, 13 सप्टेंबरपासून गुजरातमध्ये ‘भूपेंद्र अध्याय’ सुरु होणार आहे.

रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा अवधी शिल्लक असल्याने विजय रुपाणी यांचा राजीनामा अनेक राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय विजय रुपाणी राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपाने गुजरातमध्ये बहुमत मिळवले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-इस्राइल लढणार दहशतवाद्यांविरोधात

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडें आमने-सामने

News Desk

बिफ प्रकरणी पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी

News Desk