HW News Marathi
महाराष्ट्र

अमित शाह करणार कोकण दौरा, ‘या’ कामगिरीमुळे पक्षश्रेष्ठी राणेंवर खुश

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे येत्या ६ फेब्रुवारीला कोकणच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अमित शाह यांच्या कोकण दौऱ्याच्या वृत्तानंतर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असताना भाजपचे पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्यावर खुश असल्याचे म्हटले जात आहे.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला शह देत भाजपला अनेक ठिकाणी लक्षणीय यश मिळाले आहे. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेला कोकणात आव्हान देणे भाजपला शक्य झाल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे नारायण राणे यांच्यावर पक्षश्रेष्ठी खुश असल्याचे म्हटले जात आहे. याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वीच केंद्राने नारायण राणे यांना Y दर्जाची सुरक्षा दिली. तर त्यानंतर खुद्द अमित शाह कोकणचा दौरा करणार आहेत.

अमित शाह यांचा ६ फेब्रुवारीचा हा दौरा निश्चित असून यावेळी होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित असतील. दरम्यान, अमित शाह यांच्या या दौऱ्याच्यानिमित्ताने पुन्हा राज्यातील राजकारण तापणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“४० दिवसांत मुख्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागेल”

News Desk

राज्यातील ऊसतोड कामगारांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची सरकारकडे मागणी | सुरेश धस

swarit

अजित पवारांच्या राजकीय बुद्धीवर पंकजा मुंडे यांनी केला सवाल!

News Desk