HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप-शिवसेनामधील संघर्ष सोडविण्यासाठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह २ नोव्हेंबरला मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपमधील तिढा सोडविण्यासाठी शाह मुंबईला येणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलडला असून राज्यात सरकार स्थापन झाले नाही. “पुढील ५ वर्ष मीच मुख्यमंत्री पदावर राहणार,” असे धक्कादायक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केले आहे. वाटाघाडीत अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा शब्द नव्हता.” यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

“आपण मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही. भाजप अध्यक्ष अमित शाहांबरोबर माझे जे ठरलेय ते करावे एवढेच माझे म्हणणे आहे. आम्ही स्थिर सरकार देऊ. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीदिवशी अनौपचारिक गप्पांमध्ये ‘ते’ वक्तव्य करायला नको होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चा फिस्कटलीय. पण मला खात्री आहे सगळे सुरळीत होईल,” असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज (३१ ऑक्टोबर) पार पडलेल्या बैठकीत केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषा गौरवदिनी ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा! – सुभाष देसाई

Aprna

आतापर्यंत माझी दोस्ती बघितली; पण आता दुश्‍मनीही बघावी लागेल : वसंत मोरे

News Desk

कोविडच्या परिस्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुखांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा!

News Desk