HW News Marathi
महाराष्ट्र

एक्स्प्रेस रखडल्याने प्रवाशांचा उद्रेक

सिंधुदुर्ग :गणपती स्पेशल हॉलिडे एक्स्प्रेस रविवारी सकाळी सावंतवाडी स्थानकावर न आल्याने प्रवाशांचा उद्रेक झाला. रेल्वे पोलिसांना धक्काबुक्की करीत स्थानक प्रमुखांच्या कार्यालयात घुसून प्रवाशांनी प्रश्नांचा भडीमार केला. वैभववाडी रेल्वे स्थानकावरही शुक्रवारी प्रवाशांनी असाचा हंगामा केला होता.

सावंतवाडी ते कुर्ला अशी धावणारी गणपती स्पेशल हॉलिडे एक्स्प्रेस सकाळी ९ वा. मुंबईकडे जाण्यास निघणार होती, पण ही रेल्वे सावंतवाडी स्थानकावर दाखल झालीच नव्हती. ती रात्री २ वाजता पुण्याहून सुटली ती सकाळीयेईल आणि सायंकाळी ५ वा. सावंतवाडी स्थानकावर प्रवासी घेऊन निघणार, असे नियोजन होते. कोकण रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकापेक्षा १० ते १२ तास उशिराने गणपती स्पेशल गाडय़ा धावत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

मुंबईचा मुसळधार पाऊस आणि दुरोंतोच्या अपघातामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वेचे तीन पोलीस होते. त्यामुळे संतप्त प्रवाशांना आवरणे त्यांना कठीण झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी संपाची तीव्रता अधिक वाढली

News Desk

जिल्ह्याच्या बाहेरही बस सेवा होणार सुरू, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यासाठी रवाना!

News Desk