HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना हिंदुत्वापासून दुर गेली, अमित ठाकरेंचा गंभीर आरोप

नागपूर | शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्यावरुन राजकारण आधी चांगलेच तापलेले पाहायला मिळाले होते. खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात या मुद्यावरुन शाब्दीक वादावादी झालेली पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी काल (१४ फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना केली. ते नागपूर येथे एक दिवसीय खाजगी दौऱ्यावर आले होते. शिवसेनेने शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारून ते हिंदुत्वापासून दूर गेल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे असे घडल्याचा आरोप त्यांनी केला. महापुरुषांच्या जयंती आपण सणासारख्या साजरी केली पाहिजे. त्यामुळे सरकारने शिवजयंतीच्या मिरवणुकीकरिता परवानगी दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारच्या कामकाजावर नागरिक नाखूश आहेत. आरोग्य सेवक, शिक्षक, तरुण यांच्यासह सारेच आपले वेगवेगळे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत असे मत व्यक्त करून ठाकरे म्हणाले, माझ्यावर पक्षाने नवी जबाबदारी दिली आहे, ती योग्यरीत्या पार पाडण्यासाठी आधी पक्ष बांधणी करण्याचे ठरवले आहे. मी इतर पक्ष काय करतात याचा विचार करीत नाही. मला माझा पक्ष वाढविण्यासाठी काय करता येईल याचा विचार करतो. आपण नागरिकांचे मूळ प्रश्न अद्याप सोडवू शकलो नाही. त्यामुळे आधी आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहेत याची माहिती मिळाली पाहिजे, असे मतही अमित ठाकरे यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया : मुख्यमंत्र्यांकडून यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

Aprna

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना अतिशय दुःखद,घटनेची चौकशी करून सरकार दोषींवर कारवाई करणार- छगन भुजबळ

News Desk

फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंकडून रश्मी शुक्ला यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

Aprna