HW News Marathi
महाराष्ट्र

MPSCExam : विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मनसेचा सवाल

मुंबई | MPSC ची १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहेच पण महाविकासआघाडी सरकारमधीलकाही नेतेही या निर्णयाचा निषेध करत आहेत. दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांनीही याबाबत वक्तव्य केले आहे.

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक १४ मार्च रोजी होणार होती. या परीक्षेला केवळ तीन दिवस उरलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे. एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनी या निर्णयामुळे संतप्त झाले असून पुणे, संभाजीनगर तसंच राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? माझी राज्य सरकारकडे आग्रहाची मागणी आहे की, विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर ठेवून आपला निर्णय मागे घ्यावा व परीक्षा ठरलेल्या दिवशी म्हणजे १४ मार्च रोजीच घ्यावी’, अशी विनंती अमित ठाकरे यांनी सरकारला केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तोपर्यंत आम्ही विश्वास कसा ठेवणार?”; ST बाबत चर्चेच्या निमंत्रणानंतर पडळकरांचा सवाल

News Desk

‘लोकल सुरू करण्याबाबत दोन दिवसात निर्णय कळेल’, आदित्य ठाकरेंची माहिती

News Desk

नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या वस्तीवर तुफान दगडफेक

News Desk