HW News Marathi
Covid-19

अमोल कोल्हेंनी रेमेडेसिविर मिळत नसल्यास सांगितली पर्यायी औषधाची नावे!

पुणे | महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यायी आरोग्य सेवा अपूरी पडताना दिसत आहे. या कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान दिलं जाणारं रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव मुठीत आला आहे.अशातच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेमडेसिवीरला पर्यायी कोणतं औषध आहे, याबाबत नागरिकांना माहिती दिली आहे.

‘रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे? लक्षात घ्या, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर हे सुचवलं आहे. ते रुग्णाला द्यावं. शासन व प्रशासन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,’ अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर पुरवठ्याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देता येतील. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे अशी माझी नम्र विनंती आहे,’ असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचा पिंपरी-चिंचवडला अचानक दौरा 

News Desk

काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही, पण…!

News Desk

“काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करुन धार्मिक तेढ निर्माण केली”

News Desk