HW News Marathi
Covid-19

खासदार अमोल कोल्हेंची कोरोना चाचणी निगेटिव्ह

पुणे | राज्यात सामान्य नागरिकांना तर कोरोनाची लागण होत होतीच. मात्र, नगरसेवक, आमदार, नेते यांना देखील लागण होण्यास सुरुवात झाली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

“१ जुलै ते ४ जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे”.

“मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे”.

“माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना. अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत”.

“त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालयामध्ये संपर्क करू शकता”, असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केडीएमसीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३०० पार, तर ६७ वर्षीय वृध्दांचा मृत्यू

News Desk

यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk

महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढत आहे ! पंतप्रधानांकडून कौतुक

News Desk