मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (८ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. या भेटीत मराठा आरक्षण या महत्त्वाच्या विषयासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा मोदींच्या या भेटीत आहेत. या भेटीकडे आणि त्या नंतरच्या निर्णयाकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहेच, शिवाय महाराष्ट्रातील राजकीय पक्षही या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ठाकरे-मोदी भेटीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. अमोल मिटकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजुन घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारिपाठाचा 'शकुनी' डाव टाकल्या शिवाय राहणार नाही.@TV9Marathi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 8, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.