HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कुठे जातो याची कुंडली अजित पवारांकडे! – अमोल मिटकरी

पुणे | “पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कुठे जातो, कुठे बसतो, कोणत्या हॉटेलमध्ये असतो आणि काय काय करतो, याबाबतची सर्व कुंडली उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना जरा जपून आणि सांभाळून बोलावं”, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

अमोल मिटकरी टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला आहे. ते म्हणाले, “अलिकडे चंद्रकांत पाटलांचे काही वैफल्यग्रस्त विधानं येत आहेत. ते सध्या काहीही बोलतात. त्यामुळे अशा निरर्थक व्यक्तींना वेळ देऊन अजित पवारांना प्रशासकीय वेळ वाया घालवायचा नसेल”, अशी टीका त्यांनी पाटलांवर केली आहे. तसेच अजित पवारांना जेवढा प्रशासकीय अनुभव आहे तेवढा अनुभव तुम्हाला यायला अनेक वर्षे खपावं लागेल. मात्र, कोणाला किती वेळ द्यायचा याचं नियोजन अजित पवार यांच्याकडे असतं. त्यामुळे अजित पवार हे माणसं पाहून वेळ देततात, हे सूर्याइतकं स्पष्ट आहे, असंही मिटकरींनी सांगितलं.

मिटकरी पुढे म्हणाले, “चंद्रकांत पाटील कितीतरी वेळा अजित पवारांकडे जात असतात, त्यांच्याशी बोलत असतात. पण, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी चंद्रकांत पाटलांना किती वेळ द्यावा हे अजित पवारांना माहित आहे”, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. तसेच पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कुठे जात असतो, तो कुठे बसतो, कोणत्या वेळेत कुठल्या हॉटेलला भेट देतो आणि काय काय करतो याची सर्व माहिती अजित पवारांकडे आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतीत बोलताना जपून आणि सांभाळून बोलावं”, असंही त्यांनी सांगितलं. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी

News Desk

#Vidhansabha2019 : भाजपकडून तावडे, मेहतासह पुरोहित यांना घरचा रस्ता

News Desk

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप

News Desk