HW News Marathi
महाराष्ट्र

जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का? अमोल मिटकरींचा भाजपला सवाल

मुंबई |“साधूसंत सरकार पाडतील, साधूसंत म्हणजे नेमके कोण?, ते आंदोलन करणारे भोसले स्वतःला साधूसंत म्हणवून घेत आहेत. मग साधूसंतांची नक्की व्याख्या कोणती?”, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी उपस्थितीत केला आहे. मंदिरं उघडण्यासाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी तुळजापुरात आंदोलन केलं आहे. त्या आंदोलनावर टीका करताना अमोल मिटकरींनी भोसलेंवर जोरदार प्रहार केला आहे. काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा?, अशी टीकासुद्धा मिटकरींनी भोसलेंवर केली आहे.

जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का?, वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल सांप्रदायाला प्रमाण मानतो, इथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला गाडगेबाबांपर्यंतची परंपरा आहे. वारकरी सांप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही, असंसुद्धा अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

स्वतःला तुम्ही संतसाधू म्हणवून घेता, तुम्हाला हरिपाठ तरी पूर्ण पाठ आहे का?, असं थेट आव्हान मिटकरींनी भोसलेंना दिलं आहे. भारतीय जनता पार्टीने काही लोक मुद्दामहून सोडलेली आहेत. ही कुठली आध्यात्मिक आघाडी आहे. तुम्हाला जेवढी काळजी आहे, त्यापेक्षा जास्त काळजी महाविकास आघाडी सरकारला जनतेची आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता सरकारनं हे नियम लावलेले आहेत.

धर्माच्या नावावर वारकरी सांप्रदायाला बदनाम करण्याचं काम हे काही लोक करत आहेत, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. मी स्वतः वारकरी आहे. ही मुठभर मोजकी लोक यांनी मुद्दामहून सोडलेली आहेत, जेणेकरून जनतेचं लक्ष विचलित करता येईल. महाविकासआघाडीला बदनाम करण्यासाठी अशी टोकाची भाषा वापरली जात असल्याची टीकासुद्धा अमोल मिटकरींनी भाजपावर केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna

सहकारी बॅंका वाचवण्यासाठी शरद पवारांचे मोदींच्या पत्र

News Desk

नाशिक महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांचा बदलीसाठी विनंती अर्ज

News Desk