HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपमध्ये ताकद असेल तर गुजरातचे नाव बदलून कर्णावती करून दाखवा, राष्ट्रवादीचे आव्हान

अकोला | महाराष्ट्रात सध्या शहराच्या नामांतरावरुन जोरदार राजकरण सुरु आहे. नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर प्रहार केला आहे. शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, अशी टीका मिटकरींनी भाजपवर केली आहे.

भाजपमध्ये खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

गुजरातची सत्ता किती काळ भाजपजवळ आहे?, एवढ्या दिवसात अहमदाबादच नाव का बदललं नाही?, असा सवाल करत भाजपत खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं मिटकरी म्हणाले.

भाजपने घोषणा केली होती की आमची सत्ता आल्यावर अहमदाबाद शहराचं नाव बदलू… तिथं कित्येक वर्षे तुमचंच सरकार आहे, मग आजून अहमदाबादचं नाव कर्णावती का झालं नाही?, असं मिटकरी म्हणाले. तर भाजपच्या काळात कर्णावती झालं नाही तर गुजरातची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात द्या, दुस-याच दिवशी कर्नावती नाव आम्ही करुन दाखवू, असंही मिटकरी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर केले सरकार स्थापन”, मुख्यमंत्र्यांचे विधान

Aprna

ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका कीर्ती शिलेदार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची श्रद्धांजली

News Desk

राज्यात २२१ नवे रुग्ण, तर कोरोनाबाधितांची संख्या १९८२ वर पोहोचली

News Desk