HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे 

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (१० ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आम्ही तुमचे बाप आहोत असे म्हटले होते. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला आहे. “काय तर म्हणे, आम्ही तुमचे बाप आहोत. 2019 साली विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून मविआ सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.

2022 झाली पुणे मनपात पुण्याची जनता अजितदादा पवार हेच तुमचे बाप आहोत हे सिद्ध करून दाखवेल” , असे ट्विट त्यांनी केले आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पुणे महानगरपालिकेत काल झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपाचे अध्यक्ष झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पण अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्नं पडत आहेत, त्यांनी जास्त ऊर्जा वायाला घालवू नये आम्ही देखील अजित पवार यांचे बाप आहोत,”त्यामुळे आता महानगरपालिकेवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

News Desk

लोकल पाससाठी मुंबई महापालिका दोन दिवसात App तयार करणार असल्याची किशोरी पेडणेकरांची माहिती!

News Desk

घोटाळ्यात चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे पुढे काय होते !

News Desk