HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा हे जनतेला एकदा स्पष्ट सांगावं!

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. आपल्याकडे याबाबतच्या संवादाचा ६.३ जीबीचा पेन ड्राईव्ह असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता.

सीताराम कुंटेंनी पाठवलेल्या अहवालानुसार ज्या काळात फोन टॅपिंग केले त्या काळात भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याच झाल्या नाहीत. त्यासोबतच वर्ष २०२० मध्ये काही अपवाद वगळता सर्व बदल्या या पोलिस अस्थापना मंडळ-१ च्या शिफारशीच्या आधारे शासनाने केल्या असल्याचं अहवालात म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग बद्दल जो अहवाल सरकारकडे सुपूर्द केला त्यामध्ये कुठेही पेन ड्राईव्ह दिल्याचा उल्लेख नाही. मग देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा हे जनतेला एकदा स्पष्ट सांगावं, असा सवाल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेत्यांना केला आहे.

दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणावरून राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर अपक्ष आमदांराना भाजपला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस बरे व्हावे म्हणून तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो – संजय राऊत

News Desk

“मुलाच्या मतदार संघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री”

News Desk

वाढीव वीज बिलासंदर्भात बातचीत करण्यासाठी अदानी CEO कृष्णकुंजवर

News Desk