HW News Marathi
महाराष्ट्र

‘…चक्क पुण्याचे शिल्पकार, यापेक्षा मोठा जोक असूच शकत नाही”, मिटकरींनी डिवचले

पुणे | विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलैला वाढदिवस आहे. फडणवीसांच्या वाढदिवशी कोणतेही बॅनर्स किंवा हॅर्डिंग्ज लावू नये असं सांगण्यात आलं होतं. मात्र, तरीही पुण्यात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्स लागलेले पाहायला मिळत आहेत. त्यावर नव्या पुण्याचे शिल्पकार, विकासपुरुष अशा उपमा फडणवीसांना देण्यात आल्या आहेत. त्यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करुन फडणवीसांना टोला लगावला आहे. मिटकरी यांच्यासह काही पुणेकरांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बॅनर्सवर टीका केली आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

‘आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या बॅनरवरुन आणि त्यांना नव्या पुण्याचे शिल्पकार म्हटल्यावरुन टोला लगावलाय. या ट्वीटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका बॅनरचा फोटोही टाकला आहे.

पुण्यात फडणवीसांच्या नावाजी बॅनरबाजी

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलैला वाढदिवस आहे. या वाढदिवशी कोणतेही बॅनर्स किंवा हॉर्डिंग्ज लावू नये असं भाजप कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तरीही पुण्यात देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे मोठे मोठे बॅनर्स झळकताना दिसत आहेत. नव्या पुण्याचे शिल्पकार, विकासपुरुष अशा उपमा फडणवीसांना यावेळी देण्यात आल्या आहेत. मात्र, बॅनर्स, हॉर्डिंग्ज लावू नका असं सांगूनही ही बॅनरबाजी करण्यात आल्याने आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

कुठेही जाहिरात, होर्डिंग्स, उत्सव नको 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलैला म्हणजेच येत्या गुरुवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही जाहिरात, होर्डिंग्स, उत्सव नको असल्याचं सांगण्यात आलं आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षाचे कोणत्याही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर लावू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच वृत्तपत्र, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करु नयेत असं आवाहन केलं आहे.

यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजप पक्षातर्फे करण्यात आलं आहे. एवढंच काय तर होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असं भाजप पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

सेवाकार्यात योगदान द्याहोर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजपकडून करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्ह्यात मटक्याने पाय पसरले

swarit

शरद पवारांच्या भेटीनंतर खडसे आज उद्धव ठाकरेंना भेटणार

News Desk

मध्य रेल्वेकडून आणखी एक खुशखबर, राज्यात सुरु करणार आणखी ८ ट्रेन

News Desk