HW News Marathi
महाराष्ट्र

‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ म्हणत पुण्यात देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे बॅनर्स

पुणे | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलैला वाढदिवस आहे. या वाढदिवशी कोणतेही बॅनर्स किंवा हॉर्डिंग्ज लावू नये असं भाजप कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तरीही पुण्यात देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे मोठे मोठे बॅनर्स झळकताना दिसत आहेत. नव्या पुण्याचे शिल्पकार, विकासपुरुष अशा उपमा फडणवीसांना यावेळी देण्यात आल्या आहेत. मात्र, बॅनर्स, हॉर्डिंग्ज लावू नका असं सांगूनही ही बॅनरबाजी करण्यात आल्याने आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी म्हणजेच येत्या गुरुवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही जाहिरात, होर्डिंग्स, उत्सव नको असल्याचं सांगण्यात आलं आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षाचे कोणत्याही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर लावू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच वृत्तपत्र, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करु नयेत असं आवाहन केलं आहे.

यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजप पक्षातर्फे करण्यात आलं आहे. एवढंच काय तर होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असं भाजप पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

सेवाकार्यात योगदान द्या

होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजपकडून करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ‘सरकारच्या संकटमोचन’ संजय राऊतांनी धावून यावे !, शेलारांची टीका

News Desk

लॉकडाऊन कालावधीत १२२१ गुन्ह्यांची नोंद ,२ कोटी ८२ लाखाचा मुद्देमाल जप्त

News Desk

“नारायण राणे नारळासारखे आहेत”- चंद्रकांत पाटील

News Desk