HW News Marathi
महाराष्ट्र

गडकरींचा सल्ला राज्यातील 106 बेरोजगार, लवारीस ट्रोलर्स व त्यांच्या अहंकारी वाचाळविरांनी सुद्धा अंगीकारावा!

मुंबई | भाजपचे नेते नितिन गडकरी सध्या राजकारणातले वर्तृळात चर्चेचा विषय ठरले आहेत. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे अशा शब्दात भाजपा नेते नितीन गडकरींनी नेते आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. यावेळी, भाजपा नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही गडकरी यांनी हात जोडून विनंती केली. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या 106 आमदारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

केंद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरी यांनी दिलेला सल्ला सर्वांना अनुकरणीय आहे. मुत्सद्दी व संयमी असा हा नेता मला आवडतो. संघविचाराशी मी कधीच सहमत नसेल. मात्र गडकरीजीसारख्या नेत्यांचा सल्ला राज्यातील १०६ बेरोजगार, लवारीस ट्रोलर्स व त्यांच्या अहंकारी वाचाळविरांनी सुद्धा अंगीकारावा.

काय म्हणाले होते नितिन गडकरी?

कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही, अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करू नका. एकच ऑक्सिजन सिलेंडर देऊन ४ जण फोटो काढतात हे चांगले नाही. त्यातून आपल्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतो, अशा शब्दात गडकरी यांनी भाजपा नेते व कार्यकर्त्यांना सूचनावजा सल्ला दिला. नागपूर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नितीन गडकरी म्हणाले की, नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच त्याचा भाग नाही, यावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही. राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभं राहणं सामाजिक दायित्व आहे.

मला कोविड होत नाही म्हणून काहीजण गाफील राहतात. आजही अनेक नगरसेवक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोविडमध्ये बेफिकिरपणे वागतायेत असेही त्यांनी म्हटले. नितीन गडकरींना कार्यकर्त्यांना हा सल्ला दिल्यानंतर सोशल मीडियातून त्यांचं कौतुक होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

Aprna

नॉट रिचेबल ! धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी दाखल

News Desk

मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे!

News Desk