HW News Marathi
Covid-19

अमोल मिटकरींना आमदार करणार, अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई | महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आज (११ मे) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येत्या २१ मे रोजी विधानपरिषदेची निवडणूक मुंबई होणार आहे. विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील उमेवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या वर्षभरापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली होती. यावेळी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशा वेळी अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीत आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक नवा चेहरा मिळाला. अजित पवार एका जाहीर सभेत म्हणाले होते, ‘मी आमोल मिटकरी यांना आमदार करणार, असा शब्द त्यांनी दिला होता. तर दुसऱ्या बाजुला अजित पवार यांनी शिवससेनेचे माजी आमदार आमदार विजय शिवतारे यांनी यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते.. बघतो मी, असा धमकी वजा इशारा दिला होता. हे दोन्ही संदर्भ जरी वेगवेगळे असेल तरी अजित पवार यांनी दिलेले शब्द पूर्ण केल्याचे हे दोन उत्तम उदाहरण आहे.

अमोल मिटकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढली. यावेळी राष्ट्रवादीकडून मिटकरीच्या रुपाने एक तरुण नेता समोर आला होता. शिवनेरीवरुन सुरु झालेल्या यात्रेवेळी अमोल मिटकरीचे भाषणाने विरोधी पक्षावर आक्रमकपणे टीका केली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा समर्थपणे पेलवली होती. यानंतर मिटकरी यांच्या भाषणाने विधासभेच्या अनेक सभा गाजवल्या आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अजित पवार यांचे पुण्यात १४ डिसेंबर रोजी एक कार्यक्रम झाला. या वेळी केलेल्या भाषणात अजित पवार म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे पराभूत झाले त्यांना आता उमेदवारी मिळणार नाही. आता नवीन चेहऱ्यांना संधी देणार, मी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांना आमदार करणार, अशी त्यांनी घोषणा केली होती. पुढे म्हणाले, ‘मी जर ठरवले तर कुणी आमदार होऊ शकत नाही,’ असे एका जाहीर सभेत अजित पवार बोलले होते. अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनंतर मिटकर यांच्यासाठी तेव्हाच विधानपरिषदेचे दार खुली झाली होती. आणि आता अजित पवार यांनी अमिल मिटकरी यांना दिलेला शब्द अखेर पाळला. आज अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेच्या सदस्याचा अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे सध्या युतीच्या बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा जोरदार प्रचार करत आहेत. यादरम्यान ते विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंवर टीकाही अजित पवार यांच्या चांगल्याच जिव्हारी लागली होती. अजित पवार यांनी “यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते.. बघतो मी..,” अशी धमकी शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना दिली होती. अजित पवार म्हणाले, “‘शिवतारे तर काय पोपटासारखा मीठू मीठू बोलू लागलाय.. अरे विजय शिवतारे, तुझे बोलणे किती.. तुझा आवाका किती.. तू बोलतोय कोणा बरोबर.. तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते.. बघतो मी.. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय, मी जर एखाद्याला ठरवले आमदार नाय करायचे तर कोणाच्या बापाला ऐकत नाही.. आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या.. गप्प बसा गप्प बसा.. पण याचे तर उर भरून आलेय.. त्याला काय करू, काय नाय होतेय… आता २०१९ला हा कसा आमदार होतो तेच मी बघणाराय’, असे अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटले होते. पुरंदरमध्ये विजय शिवतारेंचा पराभव झाल्याने अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला इशारा खरा ठरला आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारेंचा ३० हजार ८२० मतांनी पराभव केला. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार

News Desk

“पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”

News Desk

‘कोल्हापुरातले निर्बंध 5 दिवसांसाठी शिथिल’ सरकारचा दिलासा

News Desk