HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडी एकत्र न राहिल्यास भाजपला रोखणं कठीण अमोल मिटकरी याचं वक्तव्य!

मुंबई। जर यापुढे महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर येत्या निवडणुकांमध्ये भाजपला रोखणं कठीण होईल, अस स्पष्ट मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे. अकोल्यात त्यांच्या सर्कलमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने मिटकरींना धक्का दिला. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजप १, शिवसेना १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १ आणि इतर ९ (यामध्ये प्रहार १) जागा मिळाल्या.

महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं

महाविकास आघाडीची बेरीज भाजपपेक्षा सरस आहे. मात्र इथून पुढे सर्वांनी विशेषता महाविकास आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.स्वबळावर लढलो तर भाजपला यश मिळत राहील, महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे.याबाबत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे”.

पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला

महाविकास आघाडी जर एकत्र आली नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण यश मिळवू शकणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.प्रहार या पक्षाला कुटासा या माझ्या गावात बच्चू भाऊंच्या पक्षाला फक्त ७८ मतं आहेत, आमच्या उमेदवाराला ९५३ मतं आहेत. याचा अर्थ असा आहे, कामं केलं नसती तर मतं मिळाली नसती. पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला. भाजपची मतं प्रहारने खेचली. अकोल्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादीची कामगिरी चांगली आहे. माझ्या सर्कलमध्ये पराभव झाला असला तरी ग्रामीण भागात फार मोठं यश मिळालं.बच्चू कडूंनी भाजपसोबत छुपी युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसला. त्याची दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

Aprna

वाकवली ती मान अन् म्हणे पक्ष ‘स्वाभिमान’ !

News Desk

नागपूर विभागातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – मंत्री सुनील केदार

Aprna