HW News Marathi
Covid-19

कोरोनाने रुग्णवाहिका चालकाचा मृत्यु, 20 रुग्णवाहिका सायरन वाजवत अंत्ययात्रेत सहभागी

अमरावती | राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून अहोरात्र काम करत आहे. दुुसऱ्या लाटेत अनेक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत अमरावतीमध्ये एका खासगी रुग्णवाहिका चालकाचा कोरोनाने मृत्यू झाला. ही बाब शहरातील रुग्णवाहिका चालकांसाठी धक्कादायक ठरली. त्यामुळे शहरातील रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शवविच्छेदनगृह ते हिंदू स्मशानभूमीपर्यंत सायरन वाजवीत रांंगेत 20 रुग्णवाहिका नेऊन सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभाग दर्शविला व अनोखी श्रद्धांजली वाहिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्ण वाहिका चालकाला 9 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सारीच्या वॉर्डातील दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यू झाल्यानंतर या रुग्ण वाहिका चालकाचा कोरोना रिपोर्ट positve आला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातूनच हा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी हिंदू स्मशानभूमीत नेण्यात आला होता. श्रद्धांजली म्हणून जरी इतक्या रुग्णवाहिका जात असल्या तरी काही क्षणासाठी मनात भीती दाटून नक्कीच आली.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. मात्र, रुग्णवाहिका चालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सायरन वाजवीत हिंदू स्मशानभूमीपर्यंत नेल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवायला मनाई आहे. त्याअनुषंगाने रुग्णवाहिका चालकांचे नाव निष्पन्न करून गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत कोरोनाची लस घेतल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, पालिका समिती स्थापन करत तपास करणार

News Desk

स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राकडून ‘गरीब कल्याण रोजगार योजना’, २५ हजार मजुरांना मिळणार लाभ

News Desk

पीएम केअर फंडामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माहिती देण्यास नकार

News Desk