HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळवी, यासाठी दिल्लीत महाआरती करणार, राणा दाम्पत्याची घोषणा

मुंबई | मुख्यमंत्र्यांना सद्धद्धी मिळण्यासाठी १४ मे रोजी दिल्लीत हनुमान मंदिरात महाआरती करणार आहे, अशी घोषणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्यांनी आज (११ मे) पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. “मैदानात उतरुन मुख्यमंत्री निवडणूक लढणार का?,” असा सवाल  नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. नवनीत राणा म्हणाल्या, “मुख्यमंत्री जर निवडणूक लढणार असेल तर कोणत्या मतदारसंघातून लढणार ?, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ तारखेच्या सभेत जाहीर करावे, असे आवाहन नवनीत राणा यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना सद्धद्धी मिळण्यासाठी १४ मे रोजी राणा दाम्पत्य दिल्लीत हनुमान मंदिरात महाआरती करणार आहे.” 

नवनीत राणा म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंना माझा एक प्रश्न होता, त्यांनी त्यांचे उत्तर १४ मेच्या सभेत द्यावे. ते मैदानात उतरुन निवडणूक लढणार का?, लढणार कोणत्या मतदारसंघातून लढणार. बाळासाहेब ठाकरे यांनी कोणती निवडणूक लढणार नाही. त्यांनी कधी कोणत्यापदाचे लालच केली नाही. जर तुम्हाला पदाची लालसा आहे तर तुम्ही निवडणूक लढवा. मी तुमच्याविरोधात लढणार आहे. फक्त तुम्ही १४ मे रोजी होणाऱ्या सभेत यांची घोषणा करावी की, तुम्ही कोणता जिल्हा आणि मतदारसंघातून निवडणूक लढणार ते. 

ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये आपली विचारधार सोडलेले उद्धव ठाकरेंची सभा महाराष्ट्रात होणार आहे. त्याच दिवशी आम्ही दिल्लीत कनाड प्लेसला १४ मे रोजी सकाळी ९ वाजता हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशीच दिल्लीत हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठी  १४ तारखेला आरती करणार आहे, अशी घोषणा राणा दाम्पत्यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेतून राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनावश्यक दंतवैद्यकिय सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन

swarit

महावितरणमधील तंत्रज्ञांच्या सात हजार पदांसाठी उमेदवारांची निवड येत्या आठवड्यात जाहीर होणार। नितीन राऊत

News Desk

मुंबईच्या लोकांनी गावी येऊ नये, नीतेश राणेंचा मुंबईकरांना सल्ला

swarit