HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्याची मुख्यमंत्री, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई। आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि ५०० ते ६०० शिवसैनिकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राणा दाम्पत्यांनी आज (२३ एप्रिल) खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याचा फोटो खुद राणी प्रसारित केले आहे. आता पोलीस काय मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राऊत आणि शिवसैनिकांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राणा दाम्पत्यांनी दाखल केलेल्या तक्रारी म्हटले, “२२ एप्रिल रोजी मुंबईतील खार येथील इमारतीत शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली असून शिवसैनिकांनी आम्हाला शिवीगाळ आणि धमक्या दिल्या आहेत. यानंतर २३ एप्रिल रोजी इमारती बाहेर कडकडाट पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा शिवसैनिक आमच्या फ्लॅट बाहेर त्यांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी चिथावणी देत आमच्या विरोधात नारे देत आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. आम्हाला जीवे मारण्यासाठी यात शंका नाही. मातोश्री समोर हनुमान चालिसाचे पठाण करणार असल्याचे घोषणा केली होती. यानंतर मातोश्रीवर बैठक बोलावून आजच्या दिवसाचा रणनिती आखली. यानंतर मातोश्री समोर शिवसैनिकांना बोलवून हातात बॅट आणि हॉकी या वस्तू देऊन आम्हाला जिवे मारण्यासाठी तयारी केली.

राणा दाम्पत्याला पोलिसांनी केले अटक

राणा दाम्पत्यानी दोघांना खार पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेनेच्या तक्रारीनंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे आता राणा दाम्पत्यांची आजची रात्र पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम १५३ (अ) च्या अंतर्गत राणा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कलमानुसार, राणा दाम्पत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केली, धर्म, वंश, समाजाची शांतता भंग करणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करणे, या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरयू नदीच्या तिरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती

Aprna

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मुश्रीफांच्या घोटाळ्यात पहिल्यांदाच शरद पवारांना ओढलं, किरीट सोमय्यांनी थेट नाव घेतलं!

News Desk