HW News Marathi
महाराष्ट्र

आयुक्तावर शाईफेक प्रकरणी पोलिसांनी रवी राणांवर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल

मुंबई | अमरावतीत पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा गोंदिवला आहे. तर रवी राणांविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पालिका आयुक्तांवर काल (९ फेब्रुवारी) दुपारी १ वाजताच्या सुमारास तीन महिलांनी शाई फेकली. यावेळी आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत धावून आले. पोलिसांना काल सायंकाळपर्यंत ४ जणांना ताब्यात घेतले होते. 

अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन हटवल्यावरून राजकारण तापले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराजांचा पुतळा विना परनगावी लावण्यात आला होता. तेव्हा आयुक्तांना हा पुतळा हटविल्यामुळे आयुक्तांवर काल शाई फेक झाली. आयुक्त शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्यामुळे आयुक्त यांची पाहाणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा अचानक महिला कार्यकर्त्या आल्या आणि त्यांनी आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली. 

आम्ही समस्त शिवप्रेमी आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. यानंतर महापालिकेने विना परवानगी पुतळा बसवल्यामुळे १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला.अमरावतीच्या राजापेठ येथील उड्डाण पुलावर पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा आमदार रवी राणा यांनी बसवला होता. यामुळे अमरावतीत राजकारण तापले. यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावीत कोरोनाचा दुसरा रुग्ण, पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला लागण

News Desk

सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या जलसंधारण प्रकल्पांच्या सीमा निश्चितीची  प्रक्रिया पूर्ण करावी! – अब्दुल सत्तार

Aprna

“आम्ही काय कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत?”, मुख्यमंत्री सभागृहात बरसले

News Desk