मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाजप नेत्यांवर आरोप प्रत्यारोप मालिका सुरु केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच मुंबईत ड्रग्सचा काळा धंदा सुरु झाल्याचा आरोप नवाब मलिकांनी केलाय, अशावेळी नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेला जयदीप राणाचा एक फोटो पोस्ट केला होता. हा जयदीप राणा ड्रग्स पेडलर असल्याचंही मलिक म्हणाले होते. त्यावरुन अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस आता पाठवली आहे.आणि याआधी मात्र नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक यांनी देखिल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली होती आणि त्यानंतर अमृता फडणवीसांनी मलिकांना इशारा दिला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने ड्रग्स उद्योग चालत असल्याचा घणाघाती आरोप नवाब मलिकांनी केला होता. हा आरोप करण्याआधी नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. आणि याच वेळी अमृता फडणवीस देवेंद्र फडणवीस या दोघांवरही आरोप केले होते.
चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है pic.twitter.com/FVjbOQ8jvf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
मलिकांच्या या आरोपानंतर अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी मलिकांना आता एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आणि इतकंच नाही तर पुढील 48 तासांत मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलीट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा, नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असा ट्विट करून अमृता फडणवीस यांनी मलिकांना खडसावल आहे.
Mr. @nawabmalikncp shared series of defamatory, misleading and maligning tweets including some pictures!
Here is Notice of Defamation including criminal proceedings under various Sections of IPC.
Either delete tweets in 48 hours with unconditional public apology or face action ! pic.twitter.com/nNPYQ7O9FK— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 11, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.