HW News Marathi
महाराष्ट्र

अधिकारी दीपाली चव्हाण प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची खासदार नवनीत राणांची मागणी

मुंबई | मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी काल (२५ मार्च) सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली. हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली. यावरुन आता राजकारण पेटालयला सुरुवात झाली आहे. याचे कारण असं की दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोट लिहिली आहे ज्यात त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

नवनीत राणा यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दूर्लक्ष केलं नसतं तर दीपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. तर खासदार नवनीत राणा यांनी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी आणि उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

RFO दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर अमरावती जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर खासदार नवनीत राणा यांनी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी आणि उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दीपाली माझ्याकडे आली होती. तिने मला घडलेला प्रकार आणि रेकॉर्डिंग ऐकून दाखवली होती. याबाबत अधिकाऱ्यांना कळवलं. तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. महिला अधिकाऱ्यांचा मानसिक छळ केला गेला. त्यामुळे आता दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोपीवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

दीपाली चव्हाण यांनी पत्रात काय म्हटलं आहे?

साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की त्यांनी कोणत्याही गोष्टीची खात्री न करता माझ्या नावाची नोटीस काढणे सुरु केले. काही खटकले तरी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले. माझ्याकडे 3 गावांचे पुनर्वसन आहे. मात्र साहेबांनी मला त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. पुनर्वसन करताना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी कधीच माझी बाजू समजून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले. ते फक्त आणि फक्त मला कमीपण दाखवण्याचे कारण शोधत राहतात.

मार्च 2020 मध्ये त्यांनी मांगीया येथील अतिक्रमणबाबत मला फोन केला. तू आताच्या आता आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटवं, अशा सूचना दिल्या. यानंतर मी स्टाफला घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथील लोक शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांनी फोनवर कळवल्यानंतरही ते आम्हाला तुम झूट बोल रहे हो, नाटक कर रहे हो असे म्हणाले.

जेव्हा गावकरी माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करणार होते, ते मी त्यांना कळवले त्यावेळी मी स्वत: SP ला बोलून तुमच्यावर अॅट्रोसिटी लावतो. चार महिने RFO जेलमध्ये राहिल्यानंतर कसे वाटते हे दाखवतो. याची रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे.

या आधी खासदार नवनीत राणा यांनाही ती रेकॉर्डिंग ऐकवली आहे. अ‍ॅट्रॉसिटीत बेल न झाल्याने मी सुट्टीवर गेले. त्यानंतर कोर्टाच्या निकालाबद्दल मी कळवले होते. पण शीवकुमार यांनी मला रुजू करुन घेण्यास नकार दिला. तसेच माझ्या रजा कालावधीतील सुट्टी नाकारण्याची शीफारस केली. त्यावेळी आपण देखील माझी सुट्टी नाकारली. मला पगार दिला नाही, असे दीपाली चव्हाण यांनी चिठ्ठीत म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ED, CBIच्या धाडीनंतर किरीट सोमय्या विचारतात, “प्रताप सरनाईक कुठे आहात?”

News Desk

‘तिरंदाजीत भारताला पहिलं पदक!’

News Desk

कृषी कायद्याविरोधात बातचीत करण्यासाठी शरद पवार थेट राष्ट्रपतींना भेटणार

News Desk