HW News Marathi
महाराष्ट्र

‘अमृता वहिनींनी आपल्या गाण्याच्या छंदावर काम करावं’ रूपाली चाकणकरांचा टोला!

पुणे। राज्यातल्या ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच मुद्दयावर अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला आहे. याच दौऱ्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

डबल ढोलकी वाजवण्याचे काम अमृता वहिनींचं

रुग्ण संख्या आटोक्यात आहे म्हणून घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करायचं, पुन्हा रुग्ण संख्या वाढली की सरकारवर खापर फोडायचं, असं डबल ढोलकी वाजवण्याचे काम अमृता वहिनींचं चालू आहे. त्यामुळे पुणेकरांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगण्यापेक्षा वहिनींनी आपल्या गाण्याच्या छंदावर काम केलं तर बरं होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे.त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पुणे मेट्रोच्या ट्रायलवरुनही अमृता फडणवीस यांनी टोला लगावलाय. त्यांच्या या टीकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कोण अमृता फडणवीस?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय. तसंच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं सांगत त्यांनी हा विषय टाळलाय. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगलं काम करत आहे. पण त्यांना दिलेलं काम योग्य पद्धतीनं केलं पाहिजे, अशंही पेडणेकर म्हणाल्या. लोकल सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे. पत्रकार हा कोरोना संकटाच्या काळात पुढे राहून काम करत होते. त्यामुळे त्यांना रेल्वे प्रवास मिळायला हवा, असं मतही पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive: केवळ शक्ती प्रदर्शनासाठी तुम्हाला घटकपक्षांची गरज लागते !

News Desk

गारपिटीमुळे पोपटांनी प्राण गमावले

News Desk

Antilia Bomb Scare Case :  स्फोटकांनी कार प्रकरणाचे लातूर कनेक्शन उघड, 2 जणांना अटक

News Desk