HW News Marathi
क्राइम

मलिकांच्या आरोपानंतर आता वादात अमृता फडणवीसांची उडी…

मुंबई | आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नव्याने आरोप प्रत्यारोप व्हायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्याच छत्रछायेखाली ड्रग्ज रॅकेट सुरु होते. यापैकी एका ड्रग्ज पॅडलरने अमृता फडणवीस यांच्या एका गाण्यासाठी वित्तपुरवठा केला होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या आरोपांवर अमृता यांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले.

“…कारण विनाशकाले विपरीत बुद्धी “

चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आता थोड्याचवेळात देवेंद्र फडणवीस हेदेखील पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण कितपत रंगणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.

मलिकांचे आरोप

समीर दाऊद वानखेडे जो गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये कामन करतोय त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पल्बिसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावं. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहेलीत मटका अड्ड्यावर छापा,११ जण अटक

News Desk

पोलिस पाटलाच्या भावानं केला विवाहितेवर बलात्कार

News Desk

गरीब मुलांना परदेशात नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

News Desk