HW News Marathi
महाराष्ट्र

“देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रॅगचा खेळ सुरू” – नवाब मलिक

मुंबई। राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई क्रुझ ड्रॅग प्रकरणावरून वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप एकमेकांवर केले जात आहेत. तसंच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे रोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना पाहायला मिळतात. आज देखील नवाब मलिक यांनी त्यांची पत्रकार परिषदेची मालिका सुरूच ठेवली आहे, आणि भाजपचे विरोधाीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

मालिकांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

आतापर्यंत समीर वानखेडे आणि नवाब मलिक असाच सामना सुरू होता. मात्र आजच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा आरोप नवाब मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलाय. फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहातो. ज्याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे.

भाजप आणि ड्रग्ज पेडलरचा संबंध काय याबाबत चर्चा करुया

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केंद्रीय यंत्रणा एनसीबीच्या ड्रग्ज कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मी एनसीबीच्या कारवाईविरोधात नाही परंतु बोगस कारवाई आणि वसुलीच्या विरोधात असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले आहे. तर समीर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक गौप्यस्फोट आणि आरोप नवाब मलिकांनी केला आहे. एनसीबी अधिकारी आणि भाजपचा काय संबंध आहे. याबाबतचा खुलासा नवाब मलिक करणार आहेत. मलिक मागील काही दिवसांपासून रोज नवे नवे खुलासे करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देत आहेत. तर आज भाजप आणि ड्रग्ज पेडलरचा संबंध काय याबाबत चर्चा करुया असा इशारा नवाब मलिकांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने होणार

News Desk

“उर्जामंत्र्यांचे निर्णयही प्रशासन मानत नाही”, भाई जगतापांची टीका

News Desk

अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायलाच हवा! राज ठाकरेही आक्रमक

News Desk