HW News Marathi
देश / विदेश

“व्यवहार माझे, जबाबदार वाझे !”, अमृता फडणवीसांनी डिवचले

मुंबई । निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह महाविकासआघाडी सरकारच्या असचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा धक्कादायक मृत्यू या दोन्ही प्रकारणांमुळे एकीकडे भाजप नेते महाविकासआघाडीची कोंडी करत आहेत. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील यावरून टीकेची संधी सोडलेली नाही.

 

अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणी ट्विट करत महाविकासआघाडी सरकारला डिवचले आहे. अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “कोण कोणास म्हणाले – *व्यवहार माझे,* *जबाबदार वाझे!* सांगा पाहू …….” दरम्यान, खरंतर अमृता फडणवीस या आपली भूमिका थेट मांडण्यासाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या आहेत. त्यातच आतापर्यंत कधीही अमृता फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर अत्यंत बोचऱ्या टीका केल्या आहेत. त्यामुळे, अमृता यांच्या या टिकेला काही प्रत्युत्तर येते का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले

News Desk

बदल्यांच्या फाइल्स CBIकडे जाणार!, हायकोर्टने याचिका फेटाळल्याने ठाकरे सरकारची कोंडी

News Desk

फडणवीस सरकारने सांगितल्यामुळेच मी युक्तिवाद केला नाही ! मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांवर गंभीर आरोप

News Desk