मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियात कायमच चर्चेत असतात, कधी त्यांच्या गाण्यामुळे, कधी त्यांच्या फॅशनमुळे तर कधी राजकीय टीका टिप्पणीमुळे. दरम्यान, आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस सोशल मीडीयावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यावेळी निमित्त आहे त्यांच्या नवीन गाण्याचं. व्हॅलेंटाईन डे निमित्त अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज झालं आहे. ट्विटरवरून अमृता फडणवीसांनी हे गाणं शेअर केले आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याचं छंद आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवर, तर कधी कधी सामाजिक विषयांवर अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी सादर केली आहे. यावेळी मात्र, व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने अमृता यांनी खास गाणे सादर केले आहे.
‘ये नयन डरे डरे’ असं या गाण्याचे नाव आहे. एका समुद्र किनाऱ्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. त्यांच्या या नव्या गाण्याचे सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांनी स्वागत केले आहे.दोन दिवसांपूर्वीच व्हॅलेंटाईन वीकमध्ये अमृता यांनी रेड गाऊनमधील शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली होती. रेड गाऊनमधील काही फोटो शेअर करत त्यांनी फोटोला एक कॅप्शनही दिलं. त्या कॅप्शनमधून त्या काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचं सूचवलं होतं. अखेर व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी त्यांनी हे खास गाणं रिलीज केले आहे.
Presenting for u only 🌹with lots of 💕"Ye Nayan Dare Dare'-magical mesmerising melodious masterpiece of @saregamaglobal ! All through this romantic song, I enjoyed being my own valentine & believe me it was freaking amazing! Watch 👉https://t.co/p342uSKcPJ #valentinesday2021 pic.twitter.com/C3Zd6mih5G
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 14, 2021
याआधी सुद्धा अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत होत्या. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुद्धा अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. ‘फिर से’ या गाण्याचं लाँचिंग खुद्द अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं होतं. या आधीही अमृता फडणवीस यांची काही गाणा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता हे ही गाणं लोकांच्या पसंतीस किती उतरणार हे पाहावं लागणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.