मुंबई | “आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत,” असे म्हणत पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरवरून राऊत यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या जोडे मारो आंदोलनावरून टीका केली होती.
He turns out to be more Naughty than what we thought ! #Naughty Naughty 😁
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 7, 2020
अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये गेले काही दिवस वाद सुरुच आहे. अशातच कंगना म्हणजे नॉटी गर्ल आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल (७ सप्टेंबर) केले होत. इतकेच नाही तर हरामखोर या शब्दाचा अर्थही त्यांनी उलगडून सांगितला होता. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असे मला वाटते.. असे संजय राऊत म्हणाले होते. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
काही दिवसांपूर्वीच कंगनाने तिला मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
या आधीदेखील याच प्रकरणावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटू शकत नाही, पण लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. वाद-प्रतिवाद होत रहावेत, पण पोस्टरला चपलांनी मारण हे पातळी घसरल्याचं लक्षण असल्याचं अमृता फडणवीसांनी म्हटलं होतं.
We may not agree with what someone has to say,but we must defend the right to express in democracy!Freedom of speech,freedom of belief,freedom of movement,freedom of press-cannot b suppressed! We can have counter arguments but beating posters of critics with chappals is a new low
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.