मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस भाऊबीजेनिमित्त पोस्ट केलेल्या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाल्याचे सांगत आपण पुन्हा नवीन कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ असं म्हटलं आहे. तिला जगू द्या या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. आता याच पोस्टवरील ट्विटला रिप्लाय करत अमृता यांनी या गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानले असून लवकरच मी नवीन कलाकृती घेऊन येईन असंही म्हटलं आहे.
Thank you so much for appreciating the Womens’ song- tila jagu dya with views touching 10 lakh in 2 days ! I welcome both appreciation and criticism from you – will soon come back with something new for you !
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 17, 2020
अमृता यांनी आपलं हे गाणं प्रत्येक भाऊरायाला समर्पित केलं असल्याचं म्हटलं होतं. “भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे.. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या” असं म्हणत त्यांनी त्यांचं नव्या गाण्याचा व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाल्याचे सांगत अमृता यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. “महिलांवर आधारित तिला जगू द्या या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते. दोन दिवसांमध्ये या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन लवकरच मी पुन्हा येईन,” असं अमृता यांनी ट्विट केलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.