HW News Marathi
महाराष्ट्र

“चला आपण एकत्र केंद्राकडे जाऊ”,अजित पवारांची फडणवीसांना साद

मुंबई | देशात आणि राज्यात पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्य लोकांच्या खिशाला न परवडण्यासारखे झाले आहेत. या अशा परिस्थितीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी आपण एकत्रित केंद्राकडे जाऊ, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षाला आवाहन देत चिमटा काढला. तसंच पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना केंद्राकडे एकत्रित जाण्याची साद घातल्याची चर्चाही सुरु झाली आहे.

राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याची ओरड वारंवार विरोधक करत आहेत. राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी व्हावेत किंबहुना ते कायमस्वरुपी कमी असावेत यासाठी आम्हीही आग्रही आहोत. आम्हालाही वाटतं आपल्या राज्यातील नागरिकांना कमी दरात इंधन मिळावे. त्यासाठी केंद्र सरकारने लावलेले विविध प्रकारचे कर कमी करण्याची आवश्यकता आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला विरोधकांची साथ हवी आहे. चला आपण एकत्रित मिळून पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी केंद्राकडे एकत्रित मागणी करु, असं अजित पवार म्हणाले.

संपूर्ण अधिवेशन काळात विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर वचक ठेली. प्रत्येक मुद्द्यावर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर भारी पडल्याचं चित्र निर्माण झालं. संजय राठोड, मनसुख हिरेन, सचिन वाझे अशा मुद्द्यांवर सत्ताधारी बॅकफूटला गेले होते. साहजिक ठाकरे सरकारच्या टप्प्यात असलेले वा विरोधकांना टार्गेट करता येईल असा मुद्दा होता, तो म्हणजे दिवसागणिक होणारी इंधन दरवाढ… याच मुद्द्यांवरुन अजित पवारांनी विरोधकांना टोले टोमणे लगावले. विरोधी पक्षांनी मांडलेले मुद्दे खोडून काढत अजित पवारांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. इंधन दरवाढीला राज्य नाही, तर केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. तसंच केंद्राने पेट्रोल डिझेलवर लावलेले विविध कर कमी करावेत, असंही ते यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांनो रस्त्यावर उतरा, केसेस टाकल्या तरी हरकत नाही

Sanjay Jog

देवस्थानची जमीन हडपल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर निशाणा

News Desk

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरण; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Aprna