HW News Marathi
महाराष्ट्र

तन्मय फडणवीस चुकलाचं! अमृता फडणवीस काकींनी ट्विट करत केली कानउघाडणी

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने वयाची अट असतानाही कोरोना लस कशी घेतली यावरुन अडचणीत आले आहेत. यावर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी तो माझा लांबचा नातेवाईक असल्याचे म्हणत हात वर केले असले तरी दुसरीकडे मात्र, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी तन्मय फडणवीसची कानउघाडणी केली आहे.

तन्मय फडणवीस आपला दूरचा नातेवाईक आहे, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हात झटकले आहेत. तर भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत यासाठी पावलं उचला, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि तन्मयच्या काकी अमृता फडणवीस यांनी सोयीस्कर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला अमृता फडणवीसांनी उत्तर दिले

देवेंद्र फडणवीस यांच्या २५ वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचं वादळ उठलं आहे. त्यावरुन शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ असं म्हणत ताशेरे ओढले होते. यालाच अमृता फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांचे ट्वीट काय?

“कोणत्याही सेवेची प्राथमिकता ही शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही. कायदा आपले काम करु शकतो आणि आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत! आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा!” असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी करोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नसून कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये असं फडणवीसांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमांचे उल्लंघन झालं तर हे अयोग्य आहे”.

पुढे ते असंही म्हणाले की, पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुतण्यामुळे अडचणीत आलेल्या काकांनी सरळ या प्रकरणातून हात झटकलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नेमकी कोणत्या निकषांच्या आधारे तन्मय फडणवीस यांनी लस घेतली याची तपासणी होणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

रुग्णालयाने काय स्पष्टीकरण दिले?

दरम्यान नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, “तन्मय फडणवीसने आमच्याकडे लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्याला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डिसलेंवर कारवाई करणाऱ्यांची होणार चौकशी; खुद्द शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल

News Desk

उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प! – चंद्रकांत पाटील

Aprna

“…अॅमेझॉनचे पार्सल परत पाठवले”, उद्धव ठाकरेंचा भगतसिंग कोश्यारींना टोला

Aprna