HW News Marathi
महाराष्ट्र

“शवसेनेने आपल्याच साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले!” अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई | बिहारमध्ये एनडीएने बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून काम करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या या विजयामुळे कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या मित्रपक्षांना ठार केलं असा टोला लगावला आहे. अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेचा ‘शवसेना’ असा उल्लेख केला आहे.

अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांनी एनडीएने बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर दिलेल्या मुलाखतीचा एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेने कशाप्रकारे बिहारमधील निवडणुकीमध्ये खराब कामगिरी करत आपलं हसं करुन घेतलं आहे याबद्दल भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधीतरी बिहारमध्ये काही जागा निवडून यायच्या मात्र आता तेही झालं नाही असं म्हणतं शिवसेनेबरोबर सध्या सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीलाही टोला लगावला आहे.

याचवरुन अमृता यांनी शिवसेनेने आपल्या साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले अशी टीका ट्विटवरुन केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्या बाबत धन्यवाद,” असं म्हणत बिहारमधील मतदारांचे आभार मानले आहेत.

काय केले आहे अमृता फडणवीसांनी ट्विट?

“का हय ये – शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे ! काय चाल्लय तरी काय – शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहारमध्ये ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद!” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तालिबानींपेक्षा ही भयंकर तालिबानी हे लोकं ”, आशिष शेलारांचं विधान

News Desk

शांत राहूनही चांगले काम करता येते, त्यासाठी घसा फोडण्याची गरज नसते

News Desk

नोटा बंदीच्या काळात जिल्हा बँकेचे १०१ कोटी बुडाले, पवारांनी दाखवले पत्र

News Desk