HW News Marathi
महाराष्ट्र

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालावरुन अमृता फडणवीसांचे सुचक ट्विट

मुंबई | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची चुरशी पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात हा सामना रंगला. दरम्यान, भाजपचा पुणे आणि नागपूरमध्ये पराभव झाला असून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या वाट्याला यश आले आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की वाईट सुरुवात झाली त्याचा शेवट चांगलाच होतो, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली हार मानत शिवसेनेला मात्र टार्गेट केल्याचे दिसले आहे. आमची एख जागा आली त्यांची एकही जागा आली नाही. शिवसेनेला आत्मचिंतन करणे आवश्यक आहे असा टोला फडणवीसांनी लगाला आहे. तर चंद्रकांत पाटील असं म्हणाले की हिंमत असेल तर एकटे लढून दाखवा. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात जल्लोषाचे वातावरण जरी असले तरी आता भाजपचे आणि आघाडिचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमधील ‘त्या’ चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी अखेर चार वाळूमाफियांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल!

News Desk

मराठा आरक्षण रद्द, पण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

News Desk

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करा, रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk