HW News Marathi
महाराष्ट्र

‘नव्या भारताचे पितामह’ अमृता फडणवीसांकडुन मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर) ७०वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोदींना नव्या भारताचे पितामह म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अमृता फडणवीसांसोबत अनेक जणांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

भारताला इतर कोणत्याही देशाचे अनुकरण करण्याची गरज नाही! भारत हा फक्त भारतच बनला पाहिजे कारण एकेकाळी भारताला ‘सोने का चिड़िया’ म्हटलं जात होतं असं पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य होतं. हे वाक्य ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मोदींचा उल्लेख ‘नव्या भारताचे पितामह’ असा केला आहे. पंतप्रधान मोदींसारख्या अनुभवी नेतृत्वाला विकासाचा मार्ग माहिती आहे, ते मार्ग जाणतात आणि मार्ग दाखवतात! अशा दूरदर्शी नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीत समर्थकांची तुफान गर्दी

News Desk

“निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली” – बाळासाहेब थोरात

News Desk

संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना जामीन मंजूर

Aprna