HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर सत्ताधारी आणि विरोधी एकत्र, राजकारण करणार नाही, फडणवीसांचे आश्वासन!

मुंबई | “आम्ही सरकारसोबत आहोत, यामध्ये कुठलेही राजकारण आणणार नाही,” असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर भाजपकडून सत्ताधारी पक्षावर टीका करण्यास सुरुवात झाली. तसेच, काल (१६ सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक पार पडली.

“मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकार सध्या तीन पर्यायाने विचार करत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतोय. आम्ही सरकारबरोबर आहोत, यात कुठलंही राजकारण आणणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“सरकार घटनापीठाकडे जाणार आहे तर त्याला पाठिंबा देऊ. सरकारने मराठा समाजाला आश्वस्त केलं पाहिजे. जागा वाढवल्या, तर मराठा विद्यार्थींना न्याय मिळेल. या जागांवरील विद्यार्थ्यांची फी सरकारने प्रतिपूर्ती करावी”, असेही फडणवीसांनी सांगितले आहे.

“लवकरच ड्राफ्ट तयार करुन तो मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवायचा आहे. या कायद्याला स्थगिती देता येत नाही, मग त्याठिकाणी आपण कमी पडलो का ? असेही ते यावेळी म्हणाले तसेच पुन्हा घटनापीठाकडे सर्व तयारीनिशी जाऊ. मराठा आरक्षण कसं बहाल करता येईल, त्यासाठी प्रयत्न करु असं आम्ही सरकारला सांगितलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहिणी खडसे यांनी बलात्काराच्या प्रकरणावरुन केली धनंजय मुंडेंची पाठराखण

News Desk

सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ

News Desk

बंद लसीकरण केंद्राबाहेर घंटानाद, थाळीनाद करून केंद्र सरकारचा निषेध करणार, नाना पटोलेंचा इशारा

News Desk