HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पवार कुटुंबाची उद्या महत्त्वाची बैठक, अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपले नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांना जाहीरपणे तीव्र शब्दांत फटकारले. पवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली. त्याचप्रमाणे, त्याचा थेट परिणाम पवार कुटुंबावरही झाल्याचे म्हटले जात आहे. पवार कुटुंबात निर्माण झालेला हाच तणाव आणि वाद मिटवण्यासाठी उद्या (१५ ऑगस्ट) संपूर्ण पवार कुटुंबाची बारामतीत एकत्र चर्चा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर, अजित पवार आणि पार्थ पवार बारामतीचा रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या चर्चेतून या प्रकरणाला नेमके कोणते वळण मिळणार ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवार कुटुंबीय शनिवार (१५ ऑगस्ट) आणि रविवारी (१६ ऑगस्ट) बारामतीत एकत्र येणार आहेत. बारामतीत अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी पवार कुटुंबीय एकत्र येऊन ही चर्चा करणार आहेत. पार्थ पवारांनी राष्ट्रवादीशी घेतलेल्या पूर्णपणे विसंगत अशा भूमिकेमुळे शरद पवार तीव्र नाराज असून त्यांची ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे. मात्र, बारामती उद्या होणाऱ्या पवार कुटुंबियांच्या चर्चेत नेमके काय होणार ? शरद पवार कोणता निर्णय ? अजित पवार आणि पार्थ पवारांची भूमिका असणार ? याकडे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

पार्थ पवारांनी सुप्रिया सुळेंकडे व्यक्त केली होती दिलगिरी


काल (१३ ऑगस्ट) रात्री पार्थ पवार यांनी सिल्व्हर ओक गाठले. त्यावेळी पार्थ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच त्यानंतर पार्थ यांनी शरद पवारांचीही भेट घेतली.

काय म्हणाले होते शरद पवार ?

शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारताना असे म्हटले कि, “पार्थ पवार इममॅच्युर. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही.” दरम्यान, पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांत राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि शरद पवारांविरोधात आणि विसंगत अशी भूमिका घेताना दिसून आले. राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. त्यानंतर काल (१२ ऑगस्ट) खुद्द शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Related posts

महाराष्ट्राबाहेर सभा घेणार नाही !

News Desk

उद्धव यांना ‘मोस्ट कन्फ्युज्ड पॉलिटिशियन’ पुरस्कार द्या | विखे पाटील

Gauri Tilekar

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचे आशिष शेलार यांनी केले स्वागत

News Desk