HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये २४ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार; चौघांवर गुन्हा नोंद!

बीड | बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आली आहे. बीडमधील एका 24 वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या एकाने, गुंगीचे ज्यूस देऊन अहमदनगर शहरात, तर दुसऱ्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे यावेळी तिघा नराधमांनी रात्रभर छेड काढली. नात्यातीलचं नराधम तरुणांनी हे कृत्य केल्यानं, बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते सर्व रा. बेलुरा या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

याविषयी पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, 24 वर्षीय पीडित विवाहिता ही आपल्या 2 लहान मुलं, नवरा अन सासुसह पुण्यात रहाते. मात्र नवऱ्यासोबत 4 एप्रिल रोजी किरकोळ भांडण झाल्याने, ती माहेरी बीडला आली. मात्र आईने ” तू एकटीच का आली, तू परत तुझ्या नवऱ्याकडे जा” असं सांगितलं. त्यांनतर ती बीड शहरातील आपल्या मैत्रिणीकडे काही दिवस राहिली. आणि 11 एप्रिलला रोजी पीडिता रात्री ट्रॅव्हल्सने पुण्याला निघाली.

यादरम्यान पीडितेचा नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या आरोपी अजय गवते याने फोन केला. आणि “मला काकांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलं आहे, तुम्ही अहमदनगरच्या चांदणी चौकात उतारा” असं म्हणाला. त्यांनतर पीडिता सांगितलेल्या ठिकाणी उतरली. काही वेळात आरोपी अजय तिथं आला, आणि आता खूप रात्र झालीय, आपण इथल्या लॉजवर मुक्काम करू अन उद्या निघू असं म्हणाला. त्यानंतर लॉजवर आल्यावर अजयने गुंगीचे ज्यूस दिलं अन त्यांनतर अतिप्रसंग करत बलात्कार केला. आणि त्यानंतर अश्लील फोटो व्हिडिओ देखील काढले. दुसऱ्या दिवशी नराधम आरोपी अजयने जीपमध्ये बसवून पीडितेला पुन्हा बीडला पाठवले.

यादरम्यान पीडिता हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाली असतांना, बेलुरा गावातील दत्ता गवते याचा फोन आला. यावेळी तो म्हणाला, की अजयचे अश्लिल व्हीडिओ माझ्याकडे आहेत, “तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल” म्हणत त्याने पीडितेला ब्लॅकमेल केलं. त्यांनतर तो हॉस्पिटलजवळ आला, आणि आता रात्र झाली आहे तुम्ही माझ्या घरी चला. असे सांगीतल्याने पीडिता त्याच्या दुचाकीवर बसुन काठवटवाडी येथे रात्री दहा वाजता आल्या. मात्र यावेळी दत्ता गवते याने दुचाकी घराकडे नेण्याऐवजी दुचाकी ओढ्याजवळ थांबवीली. तेव्हा दत्ता गवते याने मागुन दुचाकीवर येणाऱ्या परमेश्वर गवते यास बोलावले आणि दोघांनी धरुन बाजुच्या शेतातील विहीरीजवळ घेवून गेले. यावेळी लगेच फोन करुन पप्पु गवते यास बोलावुन घेतले. पप्पु गवते तेथे आल्यावर दत्ता व परमेश्वरने पीडितेला धरुन ठेवले व पप्पु गवते याने अतिप्रसंग करत बलात्कार केला. नंतर दत्ता गवते, परमेश्वर गवते, पप्पू गवतेंनी रात्रभर मारहाण करत छेडछाड केली.

तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता दत्ता व परमेश्वरने पीडितेला गाड़ीवर मध्येभागी बसवुन, नवगण राजुरी येथील बसस्टॉपवर सोडले. त्यानंतर पीडिता तिच्या आईकडे गेली आणि दोन ठिकाणी घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर नवऱ्याला देखील आपबिती सांगितली. त्यानंतर पीडितेने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. यावरून नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या नराधम अजय गवते याच्यावर बलात्काराचा तर दत्ता गवते, परमेश्वर गवते, पप्पू गवते या नराधमांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी फरार असून पोलिस तपास करत आहेत. दरम्यान विवाहितेच्या मजबुरीचा आणि कौटुंबिक वादाचा गैरफायदा घेऊन, नात्यातीलच नराधमांनी हे दुष्कृत्य केल्याने, बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रावसाहेब दानवेंना लागली लॉटरी, थेट रेल्वे राज्य मंत्रीपद!

News Desk

भुजबळांना राज्य सरकारविरोधात भडकवण्याचा चंद्रकांत पाटलांचा प्रयत्न ?

News Desk

गारपिटीमुळे पोपटांनी प्राण गमावले

News Desk