HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये बस स्थानकात बेवारस बॅग सापडल्याने बस स्टँड भागांमध्ये एकच खळबळ

बीड | बीडमध्ये बस स्थानकात एक बेवारस बॅग सापडल्याने बस स्टँड भागांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, ट्राफिक पोलीस यांच्या सतर्कतेमुळे लवकर यंत्रणा हदरून गेल्या आहेत. आणि त्या ब्यागेमध्ये नेमका काय आहे हे पाहून जनतेच्या मनातली भीती ही पोलीस प्रशासनाने काढल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. बीड शहरातील मध्यवर्ती बस स्टॅन्ड या ठिकाणी एक बेवारस बॅग असल्याचे नागरिकांनी बस स्टँड लगतच असलेली पोलीस चौकी या ठिकाणे कर्तव्यावर असलेले हेडकॉन्स्टेबल जावळे आणी पोलीस कॉन्स्टेबल कोकणार, पोलीस हेड कॉन्स्टेबल दराडे यांच्याकडे माहिती दिली. या तिघांनी क्षणाचाही विलंब न करता या घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलीस कंट्रोलला कळवत तात्काळ यंत्रणा हलवली. आणि काही क्षणामध्ये या घटनास्थळी पोलीस यंत्रणेचे डॉग स्कॉड, बॉम स्कॉड आणि पोलीस यंत्रणा ही झपाट्याने याठिकाणी दाखल झाली

 या घटनास्थळी असलेली बेवारस बॅग याचा शोध आणि तपास सुरू झाला हा थरार पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र, त्या बॅगमध्ये नेमके काय आहे, हे कोणालाच माहीत नव्हते. पण, पोलीस यंत्रनेने स्वतःवर उदार होऊन पोलीस प्रशासनाने या ब्यागेकडे पूर्ण तपास करून पाहिला असता ही बॅग उघडली. मात्र, यामध्ये कपडे सापडल्याने कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु, पोलिसांच्या या तत्पर कार्याने आणि या भयभित झालेल्या नागरिकांनी जीव मुठीत घेऊन बसले होते . मात्र बागेत काहीच निघाल्यावर नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि पोलिसांच्या कार्य कर्तव्य पणाचे कौतुक देखील नागरिकांनी केले. या कर्तव्यदक्ष पणामुळे पोलिसांची मान कुठेतरी उंचावलेली पाहायला मिळते.

गेल्या अनेक दिवसांपासून एक ना अनेक घटना घडत आहेत आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी कुठेतरी संताप देखील व्यक्त होताना पाहायला मिळत होता. मात्र, आता या घटनेनंतर पुन्हा एकदा बिडकर यांच्या मनात पोलिसांनी जागा मिळवल्या पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते, SIT समितीच्या तपासात उघड

Aprna

अमित शहांनी संपूर्ण भाषणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे टार्गेट केले हेच आमचे यश – विनायक राऊत

News Desk

PandharpurElection : पंढरपूरमध्ये पोस्टल मतांची मोजणी सुरु, राष्ट्रवादी की भाजप कोण बाजी मारणार?

News Desk