HW News Marathi
राजकारण

…आणि पवारांचा माणूस शिवसेनेचा मंत्री झाला !

मुंबई | महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिपद विस्ताराचा सोहळा आज पार पडला. या विस्तारात एकुण ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. यांपैकी शिवसेनेच्या १३,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १३ आणि कॉंग्रेसच्या १० मंत्र्यांनीशपथ घेतली. या विस्तारात शिवसेनेने फक्त सेनेच्या नेत्यांना नाही तर शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या आमदारांनासुद्धा मंत्रिपदाची संधी दिली आहे.

शिवसेनेने प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चु कडू ,क्रांतिकारी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख आणि शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यांपैकी अपक्ष असले तरी कट्टर राष्ट्रवादीचे असणारे राजेंद्र यड्रावकर यांना मंत्रिपदाची संधी म्हणजे राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या माणसाला शिवसेनेने मंत्री केले ,अशीचं आहे.

विधानसभा निवडुणुकीच्या वेळी शिरोळची जागा स्वाभिमानीला गेल्याने नाराज झालेल्या यड्रावकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि दोनदा पराभूत झालेले यड्रावकर अपक्ष म्हणून निवडुन आले. ज्यांची सत्ता येईल त्यांना यड्रावकर पाठींबा देतील अशीचं परिस्थिती शिरोळमध्ये होती. महाविकासआघाडीचे सरकार येणार या पार्श्वभुमीवर यड्रावकरांनी मास्टरस्ट्रोक मारला आणि ते सेनेत गेले. राष्ट्रवादी सोडली असली तर अपक्ष म्हणून ते महाविकासआघाडीचे मंत्री झाले आहेत आणि ज्यांचा पराभव करून ते अपक्ष निवडुन आले त्याचं उल्हास पाटलांच्या शिवसेनेने त्यांना मंत्री केले. म्हणजे यड्रावकरांनी एकाचं दगडात दोन पक्षी मारले.

. राष्ट्रवादीला आज १३ मंत्रिपदे मिळाली असली तरी सेनेला पाठिंबा देणाऱ्या यड्रावकरांना शरद पवारांनीचं मंत्री केले असे बोलले जात आहे. महाविकासआघाडीचं सरकार आणण्यात शरद पवारांनी अत्यंत महत्वाची भुमिका बजावली.आणि पवारांनी राष्ट्रवादीच्या माणसाला शिवेसेनेतुन मंत्री केले !

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-मनसेत पुन्हा पोस्टर वॉर

swarit

मला मौलाना आझाद असे म्हणायचे होते, चुकून मोहम्मद अली जीना बोलून गेलो !

News Desk

एसईबीसी स्वतंत्र प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण | मुख्यमंत्री

News Desk