HW News Marathi
महाराष्ट्र

….आणि सुशीलकुमार शिंदेंनी होणारे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचे नाव घेतले

मुंबई । सोलापूरचे युवा नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज (२८ जानेवारी) मुंबईत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. दरम्यान, यावेळी आपल्या भाषणादरम्यान बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी होणारे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे नाव घेतले. मात्र, त्यानंतर तातडीने वाक्य फिरून सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या वक्तव्यावर सावरसारव देखील केली.

महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची जोरदार चर्चा होत असताना सुशीलकुमार शिंदेंनी मोठे वक्तव्य केले आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशादरम्यान बोलताना सुशीलकुमार शिंदे हे येणाऱ्या काळात महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची वाटचाल कोणत्या पद्धतीने करणे आवश्यक आहे याबाबत बोलत असताना अवधानाने “होणारे अध्यक्ष पटोले”असा सुशीलकुमार शिंदे यांनी केला. मात्र, ही गोष्ट लक्षात येताच तातडीने त्याबाबत सारवासारव करत सुशीलकुमार शिंदे यांनी विषय बदलल्याचे देखील पाहायला मिळाले.

महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असताना नाना पाटोले यांचे नाव अग्रस्थानी आहे. याच पार्श्वभूमीवर, सुशीलकुमार शिंदे यांनी अनवधानाने केलेला नाना पाटोले यांच्या नावाचा उल्लेख बरेच काही सांगून जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामनाच्या प्रकाशनावर तीन दिवस बंदी घाला : श्वेता शालिनीe

News Desk

“बेळगाव झांकी आहे, पण मुंबई अभी बाकी है”, चंद्रकांत पाटलांचा सेनेला टोला!

News Desk

आत्ता बस्स झालं ! शरद पवारांचा नाशिक विराट सभेत सरकारला निर्वाणीचा इशारा

News Desk