HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेला मोठा धक्का, २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कल्याण आणि डोंबिवलीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह जवळपास ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपच्या जागावाटपावरून नाराज असलेल्या शिवसैनिकांनी राजीनामे दिल्याची माहिती मिळाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात युतीमुळे तिकीट कापल्या गेलेल्या शिवसैनिकांची जाहीर माफी मागितली होती. तरी देखील शिवसैनिकांनची नाराजी दुर झालेली दिसत नाही. जागावाटप आणि उमेदवार निवडीविषयीची नाराजी जाहीर करण्यासाठी हे राजीनामे पाठवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसमोर पेच उभा राहिला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यावर काय मार्ग काढणार हे पहाणे औयुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, या सर्वांनी स्थानिक नेता धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. विधानसभेची उमेदवारी शिवसेनेच्या नेत्याला मिळावी अशी या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली आहे. तसेच पक्षाकडून भाजप नेते गणपत गायकवाड यांना पाठिंबा देण्यास कार्यकर्त्यांना सांगितल्याचं कळतं. त्यामुळंही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, असेही सूत्रांकडून मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांना राष्ट्रवादीकडून वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट…

News Desk

मुलांना शालेय शिक्षणाबरोबर चारित्र्य संपन्न घडवा! – उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

News Desk

पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या बातम्या केवळ अफवा, भाजपमध्ये होत्या, आहेत आणि राहतील !

News Desk