HW News Marathi
महाराष्ट्र

महावितरणच्या कार्यालयात संतप्त मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड 

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज (११ ऑगस्ट) शिरूर येथील महावितरणच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात महावितरणांकडून आकारण्यात आलेल्या अवाजवी बिलांमुळे ग्राहकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता मनसेदेखील चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेचे शहराध्यक्ष विनाश घोगरे, मनसे जनहित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे आणि मनसे कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे हे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांना भेटण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात गेले होते. मात्र, हितेंद्र भिरूड कार्यालयात हजर नसल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शिरूर येथील महावितरणच्या कार्यालयातील टेबल-खुर्च्यांची, बाकड्यांची तोडफोड केली. अवाजवी वीज बिलाबाबत वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही त्यांच्याकडे कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. अनेकदा कार्यालयात कोणीही अधिकारी हजर नसतात, ग्राहकांना सतत फेऱ्या माराव्या लागतात. त्याचप्रमाणे, सामान्य ग्राहकांना देखील उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे आरोपही मनसेकडून करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या याच बेजबाबदार वर्तणुकीमुळे मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : चारीही आरोपींना एकत्रित फाशी देण्याच्या याचिकेवर ११ फेब्रुवारीला सुनावणी

swarit

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कधी करणार?; प्रवीण दरेकर यांचा सवाल

News Desk

सेवानिवृत्तीनंतरही मुख्य सचिवासाठी राखीव बंगल्याचा मोह स्वाधीन क्षत्रियांस सुटेना 

News Desk