मुंबई | ठाकरे सरकाच्या मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून होते. ठाकरे सरकारच्या खातेवाटप आज (५ जानेवारी ) अखेर सकाळी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ठाकरे सरगकारच्या खाटेवाटपावर नाराज असलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. या पार्श्वभूमीव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवसस्थान भेटीसाठी रवाना झाले आहे.
Portfolio distribution in Maharashtra Govt: Shiv Sena's Abdul Sattar has been appointed as Minister of State (MoS) of Revenue, Rural Development, Port Land Development and Special Assistance. (File pic) pic.twitter.com/1kSKiVnAKS
— ANI (@ANI) January 5, 2020
तर राज्यमंत्री वर्णी लागली असून सत्तारांकडे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य या खात्यांची जबाबदार सोपविण्यात आली आहे. “’मी राजीनामा दिलेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मी त्यांच्याकडे सर्व माहिती देईन. ते जो निर्णय घेतील तो मान्य राहील. वेळ आल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. मी राजीनामा दिला की नाही हे माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडणाऱ्यांनाच जाऊन विचारा. माझा सर्व कंट्रोल मातोश्रीवर आहे’,” अशी माहिती सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.