HW News Marathi
क्राइम

अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची पुन्हा छापेमारी…

नागपूर | मनी लॅांडरींग प्रकरणात अडकलेल्या महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. सकाळी आठ वाजताच सीबीआयचे सात ते आठ अधिकारी देशमुखांच्या नागपुरातील घरी पोहोचले असून त्यांच्याकडे दोन जणांच्या नावे अटक वॉरंट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप सीबीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

आतापर्यंत ईडीने सहावेळा, सीबीआयने तीनवेळा आणि आयकर विभागाने छापेमारी केली

दरम्यान, देशमुख कुटुंबीय कुठे आहे याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत. देशमुखांच्या घरी आतापर्यंत ईडीने सहावेळा, सीबीआयने तीनवेळा आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या संबंधित साई शिक्षण संस्थेच्या खात्यात चार कोटी रुपये जमा झाल्याने ते आणखी अडचणीत आले आहेत. तसेच वारंवार नोटीस देऊन उपस्थित राहत नसल्याने देशमुख यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे.

अनिल देशमुख खरंतर सुमारे महिनाभरापासून ते अज्ञातस्थळी आहेत. न्यायालयाने देखील त्यांना समन्स जारी करून ईडीच्या चौकशीसाठी का हजर राहत नाही? याबाबत विचारणा केली होती. मात्र, अद्यापही अनिल देशमुख नेमके कुठे आहेत? याचा थांगपत्ता लागलेला नाही. आता सीबीआयचे अधिकारी थेट त्यांच्या नागपूरातील निवासस्थानी अटक वॉरंट घेऊन पोहोचल्याची माहिती आहे. मात्र हा अटक वॉरंट कोणाच्या नावे आहेत हे नावे अद्याप सांगता येत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

swarit

पूजा ददलानीवर मुंबई पोलिस नोंदविणार खंडणीचा गुन्हा?

News Desk

सतरा वर्षानंतर खूनातील आरोपी न्यायालयात हजर

News Desk