HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांना मोठा धक्का, दोन महत्त्वाच्या जागांवर भाजप चा ताबा

नागपूर | नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. नागपूर जिल्ह्यातील नगरखेडा पंचायत समिती व पारडसिंग जिल्हा परिषद या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होतं. मात्र या दोन्ही जागा भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. सध्या राज्यातील सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील ८४ आणि त्या जिल्ह्या परिषदांतर्गत असलेल्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान पार पडलं. आज या पोटनिवडणुक निकालांची आज मतमोजणी सुरू आहे. नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला असून दोन महत्त्वाच्या जागा भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.

नगरखेडा नगरपालिकेवर याआधी राष्ट्रवादीची सत्ता, ती जागा आता भाजपच्या ताब्यात

काटोल तालुक्यातील पारडसिंगा जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मीनाक्षी सरोदे या विजयी झाल्या आहेत. ही जागा आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र, भाजपनं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मात देत या जागेवर वर्चस्व मिळवलं आहे. नगरखेडा नगरपालिकेवर याआधी राष्ट्रवादीची सत्ता होती. ती जागा आता भाजपच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळं हा अनिल देशमुखांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. तर, एकीकडे अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या कटोल तालुक्यात पारडसिंगा जिल्हा परिषदेतही भाजपनं सत्ता मिळवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी सेल्फ क्वारंटाईन

News Desk

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून आदरांजली…

News Desk

माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी दिली 25 हजाराची मदत….!

News Desk