HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी ठेवण्याची मागणी, गृहमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई | मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर सर्व स्तरांतून आघाडी सरकार विरुद्ध टीका होण्यास सुरुवात झाली. अशातच ठाकरे सरकारने पोलीस मेगा भरती करण्याचे घोषित केले. त्यावरूनही वाद सुरू झाला आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

मराठा समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेता राज्य सरकार मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत विचार करत आहे. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. परंतु पोलीस भरतीत १३ टक्के जागा ठेवण्याबाबत कायदेशीर बाब तपासून पाहणार असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्रातच नाही इतर राज्यातही ईडीचा गैरवापर!’ शरद पवारांची टीका

News Desk

मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण म्हणजे केवळ पोकळ घोषणा, विनायक मेटेंचा वार

News Desk

सत्य बाहेर आले तर ठाकरे सरकार पडेल ! | कंगनाचा दावा

News Desk