HW News Marathi
महाराष्ट्र

डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे पटेल हे मोदींचे सहकारी – अनिल देशमुख

मुंबई | खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांचं नाव असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांचा हा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावला आहे. डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे प्रफुल्ल खेडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळी सहकारी होते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. आज (९ मार्च) अधिवेशनात हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला आहे.

अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर प्रकरणी विधानसभेत निवेदन सादर केलं. डेलकर यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्यांनी एका नावाचा उल्लेख केला आहे. दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचा उल्लेख आहे. पटेल यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला त्रास देण्यात आला. मला अडचणी येत होत्या. पटेल यांच्या माध्यमातून मला सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.

पटेल गुजरातचे माजी गृहमंत्री

प्रफुल्ल खेडा पटेल हे सध्या दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते आधी गुजरातचे गृहमंत्री होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असावेत तेव्हा पटेल हे गुजरातचे गृहमंत्री असावेत असा माझा कयास आहे. त्यानंतर पटेल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. तेव्हा सभागृहात एकच गदारोळ झाला होता.

महाराष्ट्रावर विश्वास

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर माझा विश्वास आहे. त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. मला महाराष्ट्रातच न्याय मिळेल, असंही डेलकर यांनी सुसाईडनोटमध्ये म्हटलं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

एसआयटीमार्फत चौकशी

मोहन डेलकर याच्या आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचं देशमुख यांनी जाहीर केलं.

सभागृहातील गदारोळ

दरम्यान, त्या आधी डेलकर प्रकरणावरून फडणवीस आणि अनिल परब यांच्यात जुंपली होती. तुम्ही जबाब वाचून जर वाझेंच्या अटकेची मागणी करत असाल तर त्याच न्यायाने डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्या लोकांची नावं आहेत, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी परब यांनी लावून धरत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला. फडणवीस यांनी थेट डेलकर यांची सुसाईड नोटच सभागृहात फडकवली. माझ्या हातात डेलकर यांची सुसाईड नोट आहे. यात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचं नाव नाही. प्रशासकाचं नाव आहे, प्रशासक कुणाच्याही पक्षाचे नसतात. सचिन वाझेंना वाचवण्यासाठी हे करु नये, असं सांगत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपातील हवा काढून टाकली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश…!

News Desk

तासगाव तालुक्यात  देशी दारूच्या दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र मिळणार ?

News Desk

“…मोठं काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका”, आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा!

News Desk